|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आझादनगर हाणामारी प्रकरणी प्रतिफिर्याद दाखल

आझादनगर हाणामारी प्रकरणी प्रतिफिर्याद दाखल 

महिलेसह चौघा जणांवर एफआयआर

प्रतिनिधी / बेळगाव

आझादनगर येथे ईदमिलाद मिरवणुकीदरम्यान रविवारी दुपारी घडलेल्या हाणामारी प्रकरणी महिलेसह चौघा जणांविरुध्द प्रतिफिर्याद दाखल करण्यात आली आहे. सोमवारी फिर्याद दाखल करण्यात आली असून माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आसीफ खाजापीर हुदली (वय 25, रा. अमननगर) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन सीमा सय्यद (रा. हनुमाननगर), खताल गजवाले (रा. आझादनगर), समीर खतीब (रा. आझादनगर) यांच्यासह एका अनोळखीवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मिरवणुकीत झालेल्या वादावादीनंतर हाणामारीची ही घटना घडली होती. आपल्यालाही अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आल्याचे आसीफने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.

Related posts: