|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजार शेवटच्या क्षणी किंचित वधारला

शेअर बाजार शेवटच्या क्षणी किंचित वधारला 

सेन्सेक्स 21.47 अंकानी तर निफ्टी 4.8 अंकांनी वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. मात्र, व्यापाराच्या शेवटी किंचित वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या 30 समभागांचा सेन्सेक्स 21.47 अंकांनी (0.04 टक्के) किंचित वाढीसह 40345.08 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 4.8 अंकांनी (0.04 टक्के) वाढ होऊन 11912.95 अंकांवर बंद झाला.

सर्वाधिक फायदा येस बँकेच्या समभागांना झाला. यामध्ये 5.8 टक्यांची तेजी पाहायला मिळाली. टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, इन्डसइन्ड बँक, ऍक्सिस बँक, कोटक बँक आणि टाटा स्टील यांचे समभागही तेजीत होते. तर हिरो मोटोकॉर्प, वेदान्ता, टीसीएस, आरऑईल, एशियन पेन्ट्स, मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग 2 टक्क्यांनी घसरले.

सोमवारी सकाळी 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 7 अंकांनी घसरत 40316 अंकांवर सुरू झाला. 50 समभागांचा निर्देशांक निफ्टीही 29 अंकांनी घसरणीसह 11879 अंकांवर सुरू झाला. त्यानंतर सकाळी 9.25 वाजता सेन्सेक 1 अंकांनी घसरणीवर स्थिर होता. 30 पैकी 13 समभाग नीचांकी स्तरावर आणि 17 समभाग उच्चांकी स्तरावर कायम होते. सुरुवातीच्या 15 मिनिटादरम्यान 9.30 वाजता निफ्टीच्या 50 पैकी 13 समभागांनी तेजी घेतली आणि 37 समभाग घसरणीकडे वाटचाल करत होते. या वेळी येस बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, ब्रिटानिया आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या समभागात तेजी नोंदविण्यात आली.

हाँगकाँगच्या सरकार विरोधीचे परिणाम आणि अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार चर्चेवरून अनिश्चितता असल्यामुळे प्रमुख आशियायी बाजारात घसरण होती. भारतीय बाजारावरही याचा प्रभाव पडल्याचे
पाहायला मिळाले.

Related posts: