|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची होती सूचना!

ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची होती सूचना! 

निक्की हेली यांचा दावा : 2 माजी मंत्र्यांवर केला आरोप : अध्यक्षांच्या निर्णयक्षमतेबद्दल संशय

वृत्तसंस्था/  न्यूयॉर्क 

 संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिलेल्या निक्की हेली यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी स्वतःच्या पुस्तकात अनेक खुलासे केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकारी मंत्र्यांनीच अध्यक्षांकडे देशविदेशाशी संबंधित प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘विद ऑल डय़ू रिस्पेक्ट’ या पुस्तकात हेली यांनी अनेक वादग्रस्त उल्लेख केले आहेत. माजी विदेशमंत्री रेक्स टिलरसन आणि व्हाइट हाउसमध्ये चीफ ऑफ स्टाफ राहिलेल्या जॉन केली यांनी काही मुद्यांवर ट्रम्प यांच्याकडे डोळेझाक करण्याची सूचना केली होती, असा दावा हेली यांनी केला आहे. भारतीय वंशाच्या हेली यांनी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला होता. जानेवारी 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

राष्ट्रहिताचे निर्णय

ट्रम्प यांचे म्हणणे मान्य करू नये, यासाठी केली आणि टिलरसन यांनी प्रयत्न केले होते. या भूमिकेचा अर्थ अध्यक्षांना टाळणे नव्हे तर देशाला वाचविणे असल्याचे या दोन्ही नेत्यांनी म्हटले होते. आमचे निर्णय अमेरिकेच्या हिताचे असून अध्यक्ष ट्रम्प यांच्या हिताचे नव्हेत. आपण काय करतोय हे अध्यक्षांना उमगतच नाही. अध्यक्षांना देखरेखीशिवाय सोडल्यास लोक मरतील, असे टिलरसन यांनी एकाप्रसंगी म्हटल्याचा दावा हेली यांनी केला आहे.

कटात सहभागास नकार

दोन्ही मंत्र्यांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला होता. दोघांनीही स्वतःची भूमिका ट्रम्प यांच्यासमोर मांडणे योग्य ठरले असते. त्यांनी कटात सामील होण्यास मला सांगणे टाळायला हवे होते. अध्यक्षांशी चर्चा करून स्वतःचे मतभेद दूर करण्याऐवजी त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत धोकादायक आणि घटनेचे उल्लंघन करणारा होता, असा आरोप हेली यांनी केला आहे.

Related posts: