|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » तिबेटप्रकरणी अमेरिकेचा हस्तक्षेप : चीन

तिबेटप्रकरणी अमेरिकेचा हस्तक्षेप : चीन 

लामांच्या उत्तराधिकारीची निवड : संयुक्त राष्ट्रसंघ ठरतेय माध्यम

वृत्तसंस्था/ बीजिंग

तिबेटच्या मुद्यावरून चीनने अमेरिकेच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तिबेटप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी अमेरिका संयुक्त राष्ट्रसंघाचा वापर करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनकडून राबविली जात असलेली दलाई लामांच्या उत्तराधिकारीची निवड प्रक्रिया रोखण्याचे स्वतःचे प्रयत्न अमेरिकेने गतिमान केले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाने तिबेटी धर्मगुरुच्या उत्तराधिकाऱयाचा मुद्दा हाताळावा, असे उद्गार अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्य विषयक प्रतिनिधी सॅम ब्राउनबॅक यांनी काढले होते. दलाई लामांच्या उत्तराधिकाऱयांची निवड ही तिबेटी बौद्ध परंपरेनुसार व्हावी असेही त्यांनी म्हटले होते. तर धार्मिक स्वातंत्र्याच्या नावावर अमेरिका चीनच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा दावा बीजिंग येथील प्रशासनाने केल आहे. अमेरिकेचा हा प्रयत्न निश्चितपणे अपयशी ठरणार असून आंतरराष्ट्रीय समुदायाचा विरोध सहन करावा लागणार असल्याचा दावा चीनचे विदेशमंत्री गेंग शुआंग यांनी केला आहे. हिमालयीन क्षेत्राचा विकास आणि आधुनिकीकरण करत असल्याचे सांगत चीनने दलाई लामांच्या उत्तराधिकाऱयाची निवड करण्याचे संकेत दिले आहेत.

Related posts: