|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » तेलंगणात रेल्वे दुर्घटना : 12 जखमी

तेलंगणात रेल्वे दुर्घटना : 12 जखमी 

वृत्तसंस्था/  हैदराबाद 

 तेलंगणाच्या काचीगुडा स्थानकावर दोन रेल्वेगाडय़ा परस्परांना धडकल्या आहेत. सिकंदराबाद-फलकनुमा एमएमटीएस लोकल ट्रेन स्थानकावर उभ्या असलेल्या कुर्नूल सिटी-सिकंदराबाद हुंड्री एक्स्प्रेसला धडकली आहे. या दुर्घटनेत हुंड्री एक्स्प्रेसचे 4 डबे आणि एमएमटीएसचे 3 डबे  रुळावरून घसरले असून 12 जण जखमी झाले आहेत. धडक होण्यापूर्वीच अनेक प्रवाशांनी लोकल ट्रेनमधून उडी घेतली होती.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल ट्रेनचा रुळ बदलण्यात आला होता. या बदलानंतर लोकल ट्रेन स्थानकावर उभ्या असलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसला धडकली आहे. लोकल रेल्वेचा वेग कमी असल्याने जीवितहानी टळली आहे. दुर्घटनेत मोटरमनसह रेल्वेचे 3 कर्मचारी जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासन जखमींपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत सांगितले आहे. इंजिनात अडकून पडलेल्या लोकल ट्रेनच्या चालकाला बचावपथकाने सुखरुप बाहेर काढले आहे.

Related posts: