|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

लता मंगेशकर रुग्णालयात दाखल 

प्रतिनिधी/ मुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रविवारी रात्री दीडच्या सुमारास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच पॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, असे उषा मंगेशकर यांनी सांगितले. त्यांच्या छातीत संसर्ग झाल्याने श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना तातडीने मध्यरात्रीच रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला. लता मंगेशकर यांनी जवळपास 1 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 1942 रोजी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटापासून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. 2001 मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. तर 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Related posts: