|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बौध्द चळवळीचे बाळकडू देण्य़ाची गरज

बौध्द चळवळीचे बाळकडू देण्य़ाची गरज 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध धम्माविषयी जनजागृती केली. सध्या मात्र श्रामणेर शिबिरालाही मुले मिळत नाहीत. म्हणून बौध्द धम्माचे बाळकडू देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अहमदनगर येथील धम्मपद मॉनेस्ट्रीचे संस्थापक सुधाकर नगरे यांनी केले.

कोल्हापूर भारतीय बौध्द समाज संघटनेच्या वर्धापनदिनी आयोजित शाक्यवीर सुधीर पोवार स्मृती पुरस्कार, धम्मधर पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सुधाकर नगरे यांना शाक्यवीर सुधीर पोवार स्मृती पुरस्कार तर ज्योती बुध्य़ाळकर, मनिषा कुरणे, सर्जेराव वडणगेकर, नितीन नेजकर यांना धम्मधर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रंगराव पांडे अध्यक्षस्थानी होते.

नगरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय घटना दिल्याने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे बौध्द समाजात शिक्षणाचा टक्का वाढला. परिणामी आपोआपच नोकरीच्या संधीही मिळाल्या. पण आज याच समाजाला संपण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणूनच बौध्द समाजाने एकत्रीत येवून येणाऱया संकटांचा सामना करण्याची गरज आहे. एखादा कार्यक्रम इव्हेंट न होता कृतीत उतरवला पाहिजे. सध्या ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांची समाजाप्रती जबाबदारी वाढलेली आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

संस्थेचे सचिव संतोष समुद्रे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष एम. जी. कांबळे यांनी आभार मानले. यावेळी गौतम सम्राट, मोहन गोखले, विजय कांबळे, रमेश कांबळे, संभाजी कांबळे, माणिक कांबळे, सुखदेव पुजारी, मोहन कांबळे, वंदना वराळे आदी उपस्थित होते.

Related posts: