|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » एकात्मता रॅलीने पैगंबर जयंती

एकात्मता रॅलीने पैगंबर जयंती 

ईद-ए-मिलाद कमिटीतर्फे विविध उपक्रम

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ईद-ए-मिलादुन्नबी कमिटी कोल्हापूर यांच्यावतीने पेषीत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित रविवारी सकाळी शिवाजी चौक येथून एकात्मता रॅली काढण्यात आली. शहर पोलीस उपअधिक्षक प्रेरणा कट्टी यांच्या हस्ते व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव,लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अनिल गुजर उपस्थित होते.

   शिवाजी चौक येथील घुडणपीर दर्गा येथून सुरू झालेली ही एकात्मक रॅली कोणतेही घोषणा न करता शांततेने, गुजरी,हजरत उस्मान काजी दर्गा,बाबुजमाल दर्गामार्गे नंगीवली चौक येथील नंगीवली दर्गा येथे सांगता झाली. या नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.

या रॅलीमध्ये रस्त्यावरील लोकांना खजूर,फळे,चॉकलेट,खाजा व पाणी वाटप करण्यात आले.यानंतर नंगीवली दर्गामध्ये हुबळी-धारवाडच्या प्रसिध्द डफ वाद्यवृदांने धार्मिक गीते सादर केली. या रॅलीचे आयोजन नगरसेवक तौफीक मुल्लाणी व कमिटीच्या सदस्यांनी केले. यावेळी मुस्लीम बोर्डींगचे गणी आजरेकर, मुबारक काजी,शफी पटेल,अब्दुल बारगीर,फिरोज सतारमेकर,आक्रम मुजावर,इरफान शेख,शहावाज जमादार, सादीक मकानदार आदी सहभागी झाले होते.

 

Related posts: