|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बुधगावात तीन पानी जुगार अड्डय़ावर छापा

बुधगावात तीन पानी जुगार अड्डय़ावर छापा 

प्रतिनिधी/ सांगली

बुधगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अचानक छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱया 25 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख 86 हजार 180 रुपयांसह तब्बल 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अमिर खुदबुद्दीन शेरकर (वय 42 रा. वनवासवाडी, बुधगाव), सर्जेराव बाबुराव पाटील (वय 42 रा. कवलापूर. ता. मिरज), गणेश प्रल्हाद पाटील (वय 34 रा. कवलापूर, ता. मिरज), शीतल सज्जन आवळे (वय 40 रा. बुधगाव, ता. मिरज), प्रविण तानाजी जाधव (वय 34 रा. कवलापूर, ता. मिरज), सतीश विलास देसाई (रा. बुधगाव, ता. मिरज), नाथा भगवान कांबळे (वय 30 रा. अहिल्यानगर, सांगली), सागर सुरेश आवळे (वय 30 रा. बुधगाव, ता. मिरज), दीपक सुदाम लोंढे (वय 35 रा. माधवनगर, ता. मिरज), विजय बापूराव चव्हाण (वय 42 रा. बुधगाव, ता. मिरज), दीपक राजाराम कदम (वय 42 रा. बुधगाव, ता. मिरज), दिपक मल्हारी मोरे (वय 43 रा. बुधगाव, ता. मिरज), संजय संभाजी भंडारे (वय 48 रा. बुधगाव, ता. मिरज), सागर शशिकांत देसाई (वय. 32 रा. बुधगाव, ता. मिरज), आनंद जगन्नाथ हत्तेकाठ (वय 47 रा. यशवंतनगर, सांगली), नसरुद्दीन शहारुसुल शेरकर (वय 55 रा. बुधगाव, ता. मिरज), शहारुख शौकत सय्यद (वय 24 रा. बुधगाव, ता. मिरज), सद्दाम दस्तगीर शेरकर (वय 27 रा. बुधगाव, ता. मिरज), संतोष बाबुराव पाटील (वय 52 रा. बुधगाव, ता. मिरज), विजय कोंडिबा ओलेकर (वय 30 रा. कवलापूर, ता. मिरज), तौसिफ उर्फ राजू नसरुद्दीन शेरकर (वय 28 रा. बुधगाव, ता. मिरज) व किरण बाजीराव  देवकुळे (वय 30 रा. तासगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना बुधगाव ग्रामपंचायत इमारतीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार अड्ढा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक प्रविण शिंदे, शरद माळी यांच्या पथकाने रविवारी रात्री अचानक या जुगार अड्डय़ावर छापा टाकला. यावेळी संशयित 25 जण जुगार खेळताना तिथे आढळून आले. त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख 86 हजार 180 रुपये, सव्वा चार लाख रुपयांच्या 12 दुचाकी, अडीच हजार रुपये किंमतीचे पत्याचे 28 पॅट, दीड हजार रुपयांचा एक टेबल, पाऊन लाख रुपयांचे 19 मोबाईल असा 5 लाख  90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या 25 जणांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलीस अनभिज्ञ

बुधगाव सांगली ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येते. काही गावात आजही मटका, अवैध दारु विक्रीसह जुगार खुलेआमपणे सुरु आहे. याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना नाही असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. पोलीस ठाण्यातील ‘कलेक्शन फेम’ एका कर्मचाऱयाला याची संपूर्ण माहिती आहे. मात्र कारवाई होत नसल्याने ग्रामीणच्या हद्दीत अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत.

Related posts: