|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माळशिरस येथे तरूणाचा खून

माळशिरस येथे तरूणाचा खून 

प्रतिनिधी / माळशिरस

माळशिरस शहरामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडल्याने माळशिरस शहरामध्ये खळबळ उडाली आहे. योगेश गुरव (वय 23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ महेश गुरव याने माळशिरस पोलिसांत दिली आहे. त्यानुसार माळशिरस पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरोधात 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश गुरव हा रविवारी बाजारतळ येथील आपल्या घरातून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाहेरून जेवण करून येतो म्हणून बाहेर पडला होता. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यदेह पाटबंधारे विभागाच्या डाक बंगला आवारात गळ्याला तार आवळून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला.

 याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याची ओळख पटवून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरू व पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळ माळशिरस पोलीस तपास करीत आहेत.

Related posts: