|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तौफिक शेख यांचे नगरसेवक पद रद्द

तौफिक शेख यांचे नगरसेवक पद रद्द 

प्रतिनिधी/ सोलापूर

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेस सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे नगरसेवक पद अखेर रद्द झाले आहे. याबाबत त्यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती नगरसचिव रऊफ बागवान यांनी सांगितली.

  नगरसेवकांनी सहा महिन्यात किमान एका तरी सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे नगरसेवक पद रद्द होते. एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे रेश्मा पडेकनूर खून प्रकरणामुळे विजापूर येथील तुरूंगात आहेत. शेख हे मे ते ऑक्टोबर 2019 असे सलग सहा महिने गैरहजर आहेत. त्यांच्या गैरहजेरीचा अहवाल नगरसचिव कार्यालयाकडून आयुक्तांकडे आणि आयुक्तांकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यावर विभागीय आयुक्तांकडून सभासदत्व रद्दचा प्रस्ताव आला असून त्याप्रमाणे नगरसचिव रऊफ बागवान यांनी एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांना याबाबत नोटीस पाठवली आहे. त्यामुळे तौफिक शेख यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. 

न्यायालयात दाद मागू शकतात तौफिक शेख

-नगरसेवक तौफिक शेख हे सलग सहा सर्वसाधारण सभेला गैरहजर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून नगरसेवक शेख यांना नगरसेवक पद रद्द केल्याची नोटीस पाठवली आहे. परंतु याबाबत शेख हे न्यायालयात स्वतःची बाजू मांडून दाद मागू शकतात.

-रऊफ बागवान, नगरसचिव, महापालिका

Related posts: