|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याला नंबर वन करू

उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याला नंबर वन करू 

सेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा प्रसिद्धी माध्यमाला साधला संवाद

प्रतिनिधी/ सातारा

महाशिवआघाडीचे सरकार ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब होणार आहेत.

आता जबाबदारी आहे. राज्याचा विकास करणे आणि राज्यासमोर प्रश्न आहे. तो अवकाळी पाऊस. याला प्राधान्य देऊन शेतकऱयांना दिलासा देऊन त्या संकटातून त्याना बाहेर काढणे. त्यादृष्टीने शिवसेनेच सरकार काम करेल. त्यासाठी पहिल्या दिवसापासून सर्व आमदार प्रयत्न करू. राज्याला विकासाच्या बाबतीत उध्दव साहेबांच्या नेतृत्वखाली पुढे नेऊ, अशी प्रतिक्रिया सेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी मीडियाशी बोलताना दिली.

सद्या राज्यात सरकार स्थापनेचा पेच वाढला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाशिवआघाडी झाली आहे. त्यावरून सायंकाळी सेनेचे पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुंबईत मीडियाशी सवांद साधला आहे. ते बोलताना म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी झाली आहे. दिवसभरात पवारसाहेब आणि उद्धवसाहेब यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब होणार आहेत. आता जबाबदारी आहे. राज्याचा विकास करणे आणि राज्यासमोर प्रश्न आहे तो अवकाळी पाऊस. याला प्राधान्य देऊन शेतकऱयांना दिलासा देऊन त्या संकटातून त्याना बाहेर काढणे. त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार काम करेल. त्यासाठी पहिल्या दिवसापासून सर्व आमदार प्रयत्न करू. राज्याला विकासाच्या बाबतीत उध्दव साहेबांच्या नेतृत्वखाली पुढे नेऊ, अशी त्यांनी स्पष्टोक्ती केली.

Related posts: