|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » प्रत्येक धर्मातील प्रेक्षितांनी मानवतेचाच संदेश दिला : डॉ. श्रीपाल सबनीस

प्रत्येक धर्मातील प्रेक्षितांनी मानवतेचाच संदेश दिला : डॉ. श्रीपाल सबनीस 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

मनुष्यप्राणी वेगवेगळय़ा नावाने जरी त्याच्या देवाचे स्मरण करीत असला तरी भगवंत एकच आहे. कोणी त्याला अल्लाच्या नावाने तर कोणी कृष्णाच्या नावाने हाक मारतो. सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला तर त्याचा पाया हा मानवतावदच असून, प्रत्येक धर्मातील प्रेक्षितांनी मानवतेचाच संदेश दिला असल्याचा विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचच्या वतीने आणि महामाता रमामाई आंबेडकर स्मारक समिती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक समिती, युवक क्रांतीदल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या सयोगाने हजरत महमंद पैंगबरसाहेब यांच्या जयंती निमित्त ज्येष्ठ लेखक आणि नाटय़समीक्षक राज काझी यांना सबनीस यांच्या हस्ते मानवतावादी कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी सबनीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरुद्दीन अली सोमजी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ऍड. प्रमोद आडकर, नगरसेविका लताताई राजगुरु, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सबनीस म्हणाले, सर्व धर्मात मानवतेचाच पुरस्कार केला असून, ते मानवतेचाच पुकार करतात. पंरतू, सध्या आपण मानव आणि मानवता कुंठीत झालेल्या कालखंडात जगत आहोत. सर्व राजकीय पक्ष मानवतावाद बाळगून आहेत, असे वाटत नाही कारण मानवतावाद पायदळी तोडवूनच ते सत्तेच्या राजकारणापर्यंत पोहचलेले असतात. त्यामुळेच सर्व धर्मातील मानवताची शिकवण एकत्रित केली पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर, हजरत महमंद पैंगबरसाहेब आदींनी वेळोवेळी मानवतावादी भुमिका मांडली आहे. या सर्व महामानवांनी सद्विचार करा सद्कृती करा, असाच आग्रह धरला. पैगंबरावर त्याकाळी जीवघेणे हल्ले झाले, त्याला पागल ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, त्यांनी सुमारे 1400 वर्षांपूर्वी समतेचा विचार मांडला. पैगंबर यांनी एका विधवेशी विवाह करुन स्त्री सन्मानाचा धडा घालून दिला.

 

 

 

Related posts: