|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; 25 जणांना अटक

तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; 25 जणांना अटक 

बुधागाव (मिरज) : प्रतिनिधी

येथील ग्रामपंचायत इमारतीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या 25 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख 85 हजार रुपयासह मोबाईल, दुचाकी, पत्याचे कॅट असा 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Related posts: