|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कडकनाथ प्रकल्प फसवणूक प्रकरण; शेतकर्‍यांना दीड कोटीचा गंडा

कडकनाथ प्रकल्प फसवणूक प्रकरण; शेतकर्‍यांना दीड कोटीचा गंडा 

फलटण : प्रतिनिधी

फलटण येथील फुडबर्ड प्रा. ली. कंपनीने कडकनाथ कुक्कट पालन प्रकल्पात भरघोस नफा देण्याचे आमिष दाखवत जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांना तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष मोहनराव निंबाळकर याच्यासह 10 जणांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीने सांगलीसह कोल्हापूर व सातारा येथील गुंतवणूकदार शेतकऱ्यांना तब्बल 7 कोटी रुपयांना चुना लावल्याची चर्चा आहे. यामुळे गुंतवणूकदार शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Related posts: