|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » शाओमीने तिमाहीत विकले 1.26 कोटींचे स्मार्टफोन

शाओमीने तिमाहीत विकले 1.26 कोटींचे स्मार्टफोन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सन 2019 च्या तिसऱया तिमाहीत ‘शाओमी’ या प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीने तब्बल 1.26 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच आयडीसीने ही आकडेवारी जारी केली आहे.

दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीकडून दिल्या गेलेल्या भरघोस डिस्काऊंटमुळे ही सर्वाधिक विक्री झाली आहे. या तिमाहीत 46.6 मिलियन युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वात मोठा वाटा शाओमीचा आहे. शाओमीने 1.26 कोटी युनिट्सची विक्री केली आहे. तर सर्वात मोठा फटका सॅमसंगला बसला आहे.

शाओमीने 1.26 कोटी युनिटस्ची विक्री केली आहे. या तिमाहीत शाओमी पहिल्या क्रमांकावर आहे. तर सॅमसंगने 88 लाख युनिट्सची विक्री केली आहे. सॅमसंग दुसऱया क्रमांकावर आहे. ‘ई कॉमर्स वेबसाईटवर आकर्षक ऑफर, बायबॅक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय यामुळे विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.

Related posts: