|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » न्यूयॉर्क आणि जर्मनीतील प्रसिध्द ‘जॅझ बँड’चे पुण्यात सादरीकरण

न्यूयॉर्क आणि जर्मनीतील प्रसिध्द ‘जॅझ बँड’चे पुण्यात सादरीकरण 

पुणे / प्रतिनिधी :  

थेट हृदयाला भिडणारे आणि रोमांचित करणारे संगीत, माधुर्य याबरोबरच सादरीकरणामधील नाविन्य यांचा मिलाफ अशी ओळख असलेला, न्यूयॉर्क आणि जर्मनी मधील प्रसिध्द ‘लिस्बेथ क्वारटेट’ हा ‘जॅझ बँड’ ऐकण्याची संधी पुणेकर जॅझ प्रेमींना मिळणार आहे. पुण्यातील गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन व दि पूना म्युझिक सोसायटीच्या वतीने या बँडच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार दि. 16 नोव्हेंबर  रोजी सायंकाळी 7 वाजता कॅम्पमधील लेडीज क्लब समोरील दस्तूर प्राथमिक शाळेच्या माझदा सभागृहात हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

बँड प्रमुख शारलॉट ग्रेव्ह (सॅक्सोफोन), मॅन्युएल श्माईडल (पियानो), मार्क मॉलबॉ (बेस) आणि मॉरिट्स बॉमगार्टनर (ड्रम्स) या चौघांचे सादरीकरण या वेळी होईल. या चौघांनी मिळून 2009 मध्ये या बँडची स्थापना केली असून त्यांचे जगभरात अनेक दौरे होत असतात. पुणे शहरातला या बँडचा हा पहिलाच दौरा असून पुढे ते दक्षिण आशियाच्या दौ-यावर जाणार आहेत.  

गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनच्या वतीने देश विदेशातील सांस्कृतिक क्षेत्राची ओळख व्हावी, संवाद घडावा आणि विचारांची व कलेची देवाणघेवाण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चौकडीचे काही संगीत अल्बमदेखील प्रसिद्ध झाले असून यासाठीचे स्वत: शारलॉट ग्रेव्ह या लेखन करतात. त्यांना सुचलेली धून ते आधी अनेक कार्यक्रमांमध्ये सादर करतात. त्यात येणाऱ्या प्रतिसादावर त्याचे रेकोर्डिंग करायचे की, नाही हे निश्चित केले जाते. पुण्यातील या कार्यक्रमात या चौकडीच्या काही खास धून आणि नुकताच रेकॉर्ड झालेल्या ‘देअर इज ओनली वन मेक’ या अल्बममधील गीते ‘लाइव्ह’ ऐकण्याची संधी पुणेकरांना या कार्यक्रमानिमित्त मिळणार आहे.      

Related posts: