|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » प्रकाश योजनेतून आभासी वास्तवतेची निर्मिती : प्रदीप वैद्य

प्रकाश योजनेतून आभासी वास्तवतेची निर्मिती : प्रदीप वैद्य 

पुणे / प्रतिनिधी : 

ज्यामुळे सगळे कळते तो प्रकाशअशा सरळ-सोप्या भाषेत प्रकाशयोजनेची व्याख्या सांगून प्रकाश नसता तर जग कळले नसते. शब्द कळला नाही तरी नाटकाविषयी मनात जे विचार सुरू असतात तोही प्रकाशच असतो. प्रकाश योजनाकार आभासी वास्तव निर्माण करतोअसे मत ज्येष्ठ प्रकाश योजनाकारदिग्दर्शक डॉ. प्रदीप वैद्य यांनी केले. 

शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणेतर्फे नाट्य-तंत्रज्ञ संमेलनातील चवथ्या दिवशी (दि. 11) डॉ. प्रदीप वैद्य हे किमया प्रकाश योजनेची’ या विषयावर बोलत होते. लेखकदिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नाटकाची प्रकाश योजना करताना सौंदर्यशास्त्राचा विचार करून नाटक स्पष्टपणे दिसले पाहिजेनाटक खरे आहे हे भासविता आले पाहिजे असे सांगून डॉ. वैद्य म्हणाले संहितेचे वाचन करत असताना किंवा तालीम बघत असताना प्रकाशाचे खेळ डोळ्यांसमोर दिसतात पण या खेळांना विचारांवर स्वार होऊ देत नाही. प्रकाश योजनेतील कल्पना फॅन्सी असू शकतात पण नाटक कुठे आणि केव्हा घडणार आहे याचाही विचार करावा लागतो. प्रकाश योजना हा फक्त कलाविष्कार नसून ते शास्त्रही आहे याचा विचार झाला पाहिजे.

प्रायोगिकव्यावसायिक रंगभूमीवर प्रकाश योजनेची तांत्रिक गणिते येतात त्याचप्रमाणे प्रकाश योजनेसाठीचे अर्थशास्त्रही आहे. त्याचाही विचार प्राधान्याने करावा लागतोअसे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नाटकाची प्रकाश योजना करताना वेगवेगळी नाट्यगृहेत्यांचा रंगमंच याचाही पुरेसा विचार करावा लागतो. नाट्यगृहांमधील मर्यादांमधून काम करावे लागते त्याचप्रमाणे तोकड्या सुविधांमधून उत्तमात उत्तम देण्याचा आपला प्रयत्न असतो असे डॉ. वैद्य म्हणाले.

प्रायोगिकव्यावसायिक नाटकांसाठी केलेल्या प्रकाश योजनेतून साधला गेलेला दृश्यपरिणाम चित्रफितीद्वारे दाखवून त्यातील बारकावे त्यांनी रसिकांना उलगडून दाखविले. सुरुवातीस भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे आणि संवाद पुणेचे सुनिल महाजन यांनी स्वागत केले. समीक्षक राज काझी यांनी परिचय करून दिलातर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी केले.

Related posts: