|Friday, December 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » स्कॉलरशिप अलर्ट

स्कॉलरशिप अलर्ट 

लेस्टर बी. पिअरसन इंटरनॅशनल स्कॉलरशिप 2019

कॅनडा येथील टोरांटो विद्यापीठाने भारतातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व अभ्यासक्रम शिकण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळण्याकरिता आमंत्रित केले आहे. विद्यार्थ्यांना 4 वर्षांसाठीच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचे फायदे उठवता येतील.

भारतातील जून 2019 च्या सुमारास बारावी उत्तीर्ण झालेले किंवा बारावीमध्ये सध्या शिकत असलेले विद्यार्थी जे सप्टेंबर 2020 मध्ये इंटेक सत्रांसाठी नांवनोंदणी करतील, ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा- केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील.

निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, पुस्तके आणि शैक्षणिक साहाय्य, आकस्मिक शुल्क आणि संपूर्ण आवास सुविधेच्या रूपात शिक्षणाच्या काळात 4 वर्षे शिष्यवृत्ती दिली जाईल.

 शेवटची तारीख- 29 नोव्हेंबर 2019 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक-
www.b4s.in/Tarun/LPS1

www.future.utoronto.ca>pearson

 

ग्रिफिथ यूनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ मेडिकल सायन्स स्कॉलरशिप 2019-20

ग्रिफिथ विद्यापीठाने बॅचलर ऑफ मेडिकल सायन्स अभ्यासक्रम करू इच्छिणाऱयांसाठी स्कॉलरशिप देऊ केली आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क देण्यासाठी स्कॉलरशिपची मदत होईल.   ग्रिफिथ विद्यापीठ येथे बॅचलर ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्रवेश मिळवलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.     अर्ज कसा करावा- उमेदवारांचे केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.

निवडलेल्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण शुल्कासाठी 10000 अमेरिकी डॉलर एवढी रक्कम दिली जाईल.         

शेवटची तारीख- 29 नोव्हेंबर 2019 ही अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख असेल.

अर्ज करण्यासाठी लिंक-    
www.griffith.edu.in

www.b4s.in/Tarun/GUB1

 

गर्व्हमेंट ऑफ आयर्लंड पोस्टडॉक्टरल फेलोशिप प्रोगॅम 2020

आयरिश संशोधन परिषदने या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा पात्र उमेदवारांकरिता केली आहे. आयर्लंड येथील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये पोस्ट डॉक्टरल शिक्षण घेणाऱया निवडक हुशार उमेदवारांची शिष्यवृत्तीकरीता निवड केली जाणार आहे.

31 मे 2015 आणि 31 मे 2020 या हल्लीच्या पाच वर्षांदरम्यान, वैद्यकीय  पदवी असलेले आणि काटकोर संपादन केलेली थिसिस दाखल केलेले उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा- केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवडक हुशार उमेदवारांना वार्षिक पगार म्हणून 31725 यूरो, प्रति वर्ष पीआरएसआय योगदान म्हणून प्रतिवर्ष 3425 यूरो, पेंशन योगदान म्हणून प्रतिवर्ष 6255 यूरो आणि संशोधन खर्च म्हणून प्रतिवर्ष 5000 यूरो एवढी रक्कम शिष्यवृत्तीअंतर्गत दिली जाईल.

शेवटची तारीख- 27 नोव्हेंबर 2019 या तारखेच्या आत पात्र उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज पोहचायला हवेत.

अर्ज करण्यासाठी लिंक-    
www.research.ie

www.b4s.in/Tarun/GOI7

Related posts: