|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » लहान दुकानांमध्ये लवकरच ‘मायक्रो एटीएम’ची सुविधा

लहान दुकानांमध्ये लवकरच ‘मायक्रो एटीएम’ची सुविधा 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हायपरलोकल फिनटेक नेटवर्ककडून ‘पे नियरबाय’ने लहान दुकानदारांसाठी मायक्रो एटीएमची निर्मिती केली आहे. यांचा वापर करुन कंपनी येत्या एक वर्षात ही सुविधा लहना दुकानात लागू करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या एटीएमच्या मशीनमध्ये रोकड न ठेवता तिथे एटीएम कार्ड वापरुन ही सुविधा ग्राहकांना वापरता येणार आहे. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि लहान आर्थिक बँकेसोबतही करार केला आहे.

कंपनीने मायक्रो एटीएम व्यवसाय टर्मिनलचे लाँचिंगसह पे नियरबायकडून किरकोळ डेबिट कार्डचा वापर करुन रोखीचे व्यवहारात मायक्रो एटीएममधून करण्यात येणार आहे. यामुळे दिवसभरात सर्वाधिक रोकडचे व्यवहार करणे सोपे ठरणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

10 लाख दुकानांमध्ये सुविधा

येत्या काळात आपला व्यवसाय वाढावा यासाठी तब्बल एका वर्षात 1 लाख लहान दुकानांमध्ये मायक्रो एटीएमची सोय उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्टीकरण पे नियरबायचे संस्थापक आणि सीईओ आनंद कुमार बजाज यानी दिले आहे.

ग्रामीण भागाचा विस्तार

मायक्रो मशीनचा वापर बहूतांश ग्रामीण भागात करण्यात येणार आहे. कारण या ठिकाणी बँका जवळ नसतात त्यामुळे मायक्रो एटीएम सुविधा ग्रमीण भागात लागू करणार आहे.

Related posts: