|Friday, January 24, 2020
You are here: Home » उद्योग » आधार नंबर चुकीचा दिल्यास दहा हजारपर्यंत दंड आकारणी

आधार नंबर चुकीचा दिल्यास दहा हजारपर्यंत दंड आकारणी 

नवी दिल्ली

 प्राप्तिकर भरणाऱया करदात्यांना प्राप्तीकर विभागाने पॅन नंबरच्या ठिकाणी 12 अंकी आधार नंबर वापरण्यास परवानगी दिली आहे. परंतु असे करताना करदात्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण संबंधीत करदात्याचा प्राप्तिकर जमा करताना आधार नंबर चुकीचा दिल्यास 10 हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. अर्थ विधेयक 2019 मध्ये प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या नियामानूसार केवळ पॅन कार्डच्या ठिकाणी आधार नंबर वापरण्यास परवानगी दिली आहे. सध्या सादर केलेला नवीन नियम हा ज्या ठिकाणी पॅनच्या ठिकाणी आधारचा वापर केला जातो. त्याच ठिकाणी चुकीच्या आधार नंबरच्या बदल्यात 10 हजार रुपयाचा दंड लागू करणार आहे. प्राप्तिकर रिटर्न, बँक खाते उघडणे, डीमॅट खाते उघडणे आणि 50 हजार रुपयाहून अधिक म्युच्युअल फंड आणि बॉण्ड खरेदी या ठिकाणी ही दंड आकारणी करण्यात येणार  आहे.

Related posts: