|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » स्टेट बँकेने वार्षिक जीडीपी अनुमान घटविले

स्टेट बँकेने वार्षिक जीडीपी अनुमान घटविले 

नवी दिल्ली :

स्टेट बँकने (एसबीआय) चालू आर्थिक वर्षात (2019-20) आर्थिक विकास दर (जीडीपी) 6.1 टक्क्यांहून घटून 5 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज स्टेट बँकेकडून मांडण्यात आला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत विकास दर 4.2 टक्के राहू शकतो. अशी माहिती मंगळवारी एसबीआयने आपल्या ईकोरॅप अहवालात दिली आहे. वाहन विक्रीतील घट, एअर ट्रफिकची घसरण, मुख्य उत्पादन क्षेत्रातील विकासाचा मंद वेग आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा यांच्यातील गुंतवणुकीतील झालेली घट यामुळेच सप्टेंबर तिमाहीत विकासाचा दर घटण्याची शक्यता आहे. 2020-21 पासून आर्थिक विकासाचा दर वेग धरणार असून जीडीपी दर 6.2 टक्क्यावर राहण्याचा अंदाज आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकही व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. याचाही फायदा जीडीपी वाढण्यास होणार आहे. जागतिक पातळीवरील पडसाद देशातील आर्थिक घडामोडीवर पडणार असल्याचे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.

Related posts: