|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » सरकार अक्षय ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढविणार

सरकार अक्षय ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढविणार 

2022 पर्यंत ध्येय गाठणार  : ब्राझीलमधील बैठकीत घोषणा

नवी दिल्ली

 भारतात येत्या 2022 पर्यंत अक्षय ऊर्जा निर्माण करणाऱया स्रोताचा वापर करुन 200 गीगावॅटहून अधिकची वीज निर्मिती देशात करण्यात येणार आहे.
ब्राझीलमधील ब्रासिलिया येथे ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) या देशातील मंत्र्यासोबतच्या बैठकी वेळी ही घोषणा केली आहे.

आम्ही आगामी वर्षांमध्ये 175 गीगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीची योजना उभारण्यास सुरुवात करणार आहे. तरी सध्या 83 गीगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. 31 गीगावॅटची योजना लावली आहे. तर 35 गीगावॅट संदर्भात बोलीची प्रक्रिया सुरु आहे. एकत्रितपणे 140 ते 145 गीगावॅट वीज निर्मितीची योजना कार्यरत करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री आर. के. सिंह यांनी दिले आहे.

परफार्म अचीन ऍण्ड ट्रेड (पीएटी) योजनेच्या माध्यमातून देशात 86.3 लाख टन तेलाच्या बरोबरीत विजेची बचत सरकारने केली आहे. दुसरीकडे वीजेचा खप प्रती वर्षाला 30 लाख टनाने कमी करण्याचे सरकारने ध्येय ठेवले आहे.

स्रोतांची निर्मिती

देशात 2030 पर्यंत बहूतांश वीज निर्मिती अधिकची झाल्यानंतर सरकार 55 टक्के अधिकची अक्षय ऊर्जा स्रोत निर्माण करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Related posts: