|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » भारतात ‘व्होडाफोन’ची स्थिती नाजूक : सीईओ निक रीड

भारतात ‘व्होडाफोन’ची स्थिती नाजूक : सीईओ निक रीड 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात सर्वाधिक दूरसंचार कंपन्या कार्यरत होत्या परंतु रिलायन्स कंपनीने जिओचे सादरीकरण केल्यापासून व्होडाफोन, आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांचे कंबरडे मोडल्याचे पहावयास मिळाले आहे. यावर सध्या व्होडाफोनची भारतामधील स्थिती नाजूक असल्याचे भाष्य कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निक रीड यांनी केले आहे.

भारत सरकाकडून अधिकचे कर शुल्क आणि लायसन्स व स्पेक्ट्रम वापरण्यास लावला जाणारा खर्च यामुळेच दूरसंचार कंपनी व्होडाफोनची स्थिती नाजूक होत असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोन-आयडियावर परवाना आणि स्पेक्ट्रम वापरण्याचे शुल्क  40,000 कोटी जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तर याच आदेशाला सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले आहे. त्यामुळे अगोदरच तोटय़ाचा सामना करणाऱया व्होडाफोन-आयडियाला मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मार्केटच्या बाहेर?

मागील काही दिवसांपासून माध्यमात येत असणाऱया माहितीनुसार व्होडाफोन ग्रुप बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. येणाऱया काळात कंपनी कोणती भूमिका घेणार त्यावरच ते निश्चित होणार आहे.

Related posts: