|Friday, January 24, 2020
You are here: Home » उद्योग » ‘अलिबाबा’कडून नोंदवला विक्रीचा उच्चांक

‘अलिबाबा’कडून नोंदवला विक्रीचा उच्चांक 

कंपनीची विक्री 38.4 अब्ज डॉलर्सवर : 2009 पासून ही योजना सुरू

वृत्तसंस्था / बीजिंग

चीनमधील ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणाऱया अलीबाबा कंपनीने आपल्या उत्पादनांच्या विक्रीतून नवीन विक्रम नोंदवला आहे. चोवीस तासामधील झालेल्या विक्रीचा आकडा 38.4 अब्ज डॉलर (2.74 लाख कोटी रुपये) नोंदवला आहे. हा आकडा मागील वर्षासोबत तुलना केल्यास जवळपास 26 टक्क्यांनी अधिक आहे. 2018 मध्ये एक दिवसाची विक्री 30.8 अब्ज डॉलर झाली होती. अलीबाबाच्या विक्रमाची बरोबरी ऍमेझॉनच्या दोन महिन्यात केलेल्या विक्रीसोबत केल्यास अलीबाबाच्या एक दिवसाच्या विक्रीची बरोबरी होत आहे.

विश्लेषकांची मते

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणि चीनच्या अर्थव्यवस्थेमधील आलेल्या मंदीमुळे अलीबाबाच्या विक्रीचा वेग चालू वर्षात दबावात आला आहे. तर एक दिवसांच्या विक्रीचा वेग चालू वर्षात 10 टक्क्यांवर राहणार असल्याचे अनुमान तज्ञांनी नोंदवले होते. परंतु हा वेग 26 टक्क्यांवर राहिला आहे. दुसरीकडे ग्राहकांची संख्या वाढत गेल्याने कंपनीची विक्री तेजीत राहिल्याचेही तज्ञांनी आपल्या विश्लेषणात सांगितले आहे. 

अलीबाबा हॉगकॉगच्या शेअर बाजारामध्ये लिस्टिंगसाठी आयपीओच्या माध्यमातून कंपनी तब्बल 15 अब्ज डॉलर जोडण्याची योजना राबविण्यासाठी योजना आखत आहे.  अलीबाबा कंपनीने 2009 पासून चीनमध्ये एक दिवसीय विक्रीची योजना सुरु केली होती. त्यासाठी 11 नोव्हेंबर हा दिवसच निश्चित केला होता. कारण या दिवशी 111 असा एक एक आकडा येतो. म्हणजे यातून सिंगल सेल योजना तयार केली आहे. यावर आधारीतच सध्याच्या  विक्रीचा उच्चांक नोंदवला आहे. 

Related posts: