|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » विंडीजकडून अफगाणचा ‘व्हाईटवॉश’, होपचे शतक

विंडीजकडून अफगाणचा ‘व्हाईटवॉश’, होपचे शतक 

वृत्तसंस्था/ लखनौ

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीजने अफगाणचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. सोमवारी झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विंडीजने अफगाणवर 5 गडय़ांनी विजय मिळविला.

या शेवटच्या सामन्यात अफगाणने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 249 धावा जमविल्या होत्या. अस्गर अफगाणने 86 धावांचे योगदान दिले. विंडीजतर्फे किमो पॉलने 44 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर विंडीजने 48.4 षटकांत 5 बाद 253 धावा जमवित हा सामना जिंकला. विंडीज संघातील शाय होपने शानदार नाबाद शतक झळकविले. त्याने 145 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 109 धावा केल्या. रॉस्टन चेसने नाबाद 42, किंगने 39, पुरणने 21 आणि कर्णधार पोलार्डने 32 धावांचे योगदान दिले. अफगाणतर्फे मुजिब उर रेहमानने 49 धावांत 2 गडी बाद केले. लेविस 1 तर हेतमेयर शून्यावर बाद झाले. पोलार्ड आणि होप यांनी 63 धावांची भागिदारी केली.

संक्षिप्त धावफलक- अफगाण- 50 षटकांत 7 बाद 249, विंडीज- 48.4 षटकांत 5 बाद 253 (शाय हॉप नाबाद 109, चेस नाबाद 42, किंग 39, पोलार्ड 32).

 

Related posts: