|Friday, December 6, 2019
You are here: Home » क्रिडा » नदाल, मेदव्हेदेव यांना पराभवाचे धक्के

नदाल, मेदव्हेदेव यांना पराभवाचे धक्के 

वृत्तसंस्था/ लंडन

2019 च्या टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या अंतिम स्पर्धेत स्पेनच्या टॉप सीडेड राफेल नदालला तसेच रशियाच्या मेदव्हेदेवला पराभवाला सामोरे जावे लागले. जर्मनीच्या विद्यमान विजेत्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हने नदालचा तर ग्रीकच्या या स्पर्धेत पदार्पण करणाऱया सिटसिपेसने मेदव्हेदेवला पराभूत केले.

विद्यमान विजेत्या जर्मनीच्या व्हेरेव्हने स्पेनच्या टॉप सीडेड नदालचा 6-2, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे ऍगास्सी गटातील राऊंड रॉबिन पद्धतीच्या दुसऱया एका सामन्यात ग्रीकच्या सिटसिपेसने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव केला. एटीपीच्या मानांकन यादीत अग्रस्थानासाठी वर्षअखेरीस नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात चुरस चालू आहे. सध्या या यादीत नदाल पहिल्या तर जोकोव्हिच दुसऱया स्थानावर आहे. गेल्या रविवारी जोकोव्हिचने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात इटलीच्या बेरेटेनीचा पराभव केला तर ऑस्ट्रीयाच्या थिएमने स्वीसच्या अनुभवी रॉजर फेडररला सरळ सेटस्मध्ये पराभूत केले होते. जोकोव्हिचने आतापर्यंत पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

Related posts: