|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » स्टीव्ह स्मिथचे प्रथमश्रेणीतील संथ शतक

स्टीव्ह स्मिथचे प्रथमश्रेणीतील संथ शतक 

वृत्तसंस्था/ सिडनी

येथे सुरू असलेल्या शेफिल्ड शिल्ड प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भरवंशाचा फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने संथ शतक झळकविले. त्याचे हे प्रथमश्रेणीतील 42 वे शतक 290 चेंडूत नोंदविले गेले.

पाकविरूद्ध झालेल्या टी-20 सामन्यात स्मिथने 51 चेंडूत जलद नाबाद 80 धावांची खेळी केली होती. न्यू साऊथ वेल्स आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया यांच्यातील या सामन्यात स्मिथने न्यू साऊथ वेल्सकडून हे शतक झळकविले. न्यू साऊथ वेल्सने आपला डाव 8 बाद 444 धावांवर घोषित केला. गब्बा मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यातील पहिल्या कसोटीला 21 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून या मालिकेपूर्वी स्मिथला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवते.

Related posts: