|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » दीपक चहरची आणखी एक हॅट्ट्रीक

दीपक चहरची आणखी एक हॅट्ट्रीक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सय्यद मुश्ताक अली टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान संघाकडून खेळताना वेगवान गोलंदाज दीपक चहरने हॅट्ट्रीक नोंदविली. 27 वर्षीय चहरने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱया आणि शेवटच्या टी-20 सामन्यात हॅट्ट्रीकसह 6 गडी बाद करत भारताला मालिका विजय मिळवून दिला होता. टी-20 प्रकारात हॅट्ट्रीक नोंदविणारा चहर हा भारताचा पहिला पुरुष गोलंदाज आहे.

राजस्थान आणि विदर्भ यांच्यातील सामन्यात विदर्भने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 13 षटकांत 9 बाद 99 धावा जमविल्या. राजस्थानच्या चहरने तीन षटकांत 18 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. डावातील 13 वे षटक टाकत असताना चहरने चौथ्या चेंडूवर विदर्भच्या नालकंडे, पाचव्या चेंडूवर श्रीकांत वाघ आणि सहाव्या चेंडूवर अक्षय वाडकर यांना बाद केले.

Related posts: