|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » कोहली, बुमराह यांचे अग्रस्थान कायम

कोहली, बुमराह यांचे अग्रस्थान कायम 

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या वनडे ताज्या मानांकन यादीत फलंदाजीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच गोलंदाजीत जसप्रित बुमराह यांनी आपले अग्रस्थान कायम राखले आहे. फलंदाजांच्या यादीत कोहली 895 गुणांसह पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱया स्थानावर आहे.

वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत जसप्रित बुमराह 797 गुणांसह पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंडचा बोल्ट दुसऱया स्थानावर आहे. आयसीसीच्या पहिल्या 10 अष्टपैलूंच्या मानांकन यादीत भारताच्या हार्दिक पांडय़ाचा समावेश आहे. त्याने 246 गुण घेतले आहेत. या यादीत इंग्लंडचा स्टोक्स 319 गुणांसह पहिल्या, अफगाणचा मोहम्मद नबी दुसऱया स्थानावर आहे.

Related posts: