|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत साई प्रणित दहाव्या स्थानी

बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत साई प्रणित दहाव्या स्थानी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे घोषित करण्यात आलेल्या पुरूष बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू बी. साई प्रणितने पहिल्या दहा बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळविताना आपल्याच देशाच्या के श्रीकांतला मागे टाकले आहे. साई प्रणित या मानांकन यादीत दहाव्या स्थानावर असून के श्रीकांत 13 व्या स्थानावर आहे.

पुरूष दुहेरीच्या मानांकन यादीत भारताच्या सात्वीक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने सातवे स्थान मिळविले आहे. थायलंडमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.

Related posts: