|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू संघटनेच्या अध्यक्षपदी वॅटसन

ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू संघटनेच्या अध्यक्षपदी वॅटसन 

वृत्तसंस्था / सिडनी

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॅटसन याची ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संघटनेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत वॅटसनची अध्यक्षपदासाठीं एकमताने निवड करण्यात आली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेमध्ये निवड करण्यात आलेल्या 10 सदस्यांच्या पॅनेलमध्ये पॅट कमिन्स, बिम्स यांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी क्रिकेटपटू मेलेनी जोन्सची संचालकपदी नियुक्ती केली होती. अष्टपैलू वॅटसनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 59 कसोटी, 190 वनडे आणि 58 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Related posts: