|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » सुंदर सिंग गुर्जरला विश्वजेतेपद

सुंदर सिंग गुर्जरला विश्वजेतेपद 

दुबई / वृत्तसंस्था

खांद्याच्या दुखापतीतून सावरत सुंदर सिंग गुर्जरने विश्व पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या एफ46 भालाफेक इव्हेंटचे सुवर्ण जिंकले. शिवाय, कांस्य जेते अजीत सिंग, रिंकू यांच्यासह टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील आपले स्थानही निश्चित केले.

गुर्जरने 61.22 मीटर्सची हंगामातील वैयक्तिक सर्वोत्तम फेक नोंदवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अजीत सिंगने 59.46 मीटर्सचे फेक करत कांस्य जिंकले तर रिंकूला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटीच्या नियमाप्रमाणे, विश्व पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील पहिले चार स्पर्धक पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात. यात फक्त मॅरेथॉनचा समावेश असत नाही.

23 वर्षीय गुर्जरने येथे लंडन वर्ल्ड 2017 चॅम्पियनशिपमधील जेतेपद कायम ठेवलेच. शिवाय, दोन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा तो केवळ दुसराच भारतीय ठरला. यापूर्वी देवेंद्र झाजरियाने 2013 लियॉन व 2015 दोहा चॅम्पियनशिपमध्ये जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती.

पाचव्या प्रयत्नापर्यंत दुसऱया स्थानी समाधान मानावे लागलेल्या गुर्जरने सहाव्या प्रयत्नात 61.22 मीटर्सची फेक केली आणि त्यानंतर त्याचे आघाडीचे स्थान निश्चित झाले. लंकेच्या दिनेश पी हेराथला 60.59 मीटर्सच्या फेकीनंतर ते सातत्य पुढे कायम राखता आले नाही. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 2 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक जिंकले असून सोमवारी दिवसातील शेवटच्या टप्प्यात आणखी 6 इव्हेंटमध्ये भारताचा सहभाग असणार होता.

Related posts: