|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आजच्या महापौर आरक्षण सोडतीकडे लक्ष

आजच्या महापौर आरक्षण सोडतीकडे लक्ष 

सर्वसाधारण पुरूष अथवा महिला : ओबीसी पुरूष, अनुसूचित महिला आरक्षणाची शक्यता

प्रतिनिधी/ सांगली

 राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयात काढण्यात येणार आहे. यात  महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. सध्या महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण असून त्याची मुदत अद्यापही सव्वावर्षाची आहे. दीड वर्षानंतर लागू होणाऱया आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. सांगली महापालिकेसाठी सर्वसाधारण पुरूष, महिला, ओबीसी पुरूष आणि अनुसुचित जाती महिला आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे.

 मुंबई मंत्रालयात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. यात सांगली महापालिकेच्या उर्वरित अडीच वर्षासाठी आरक्षण सोडत असणार आहे. यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता असून ओबीसी महिला आरक्षण असल्याने सौ. संगीता खोत यांना महापौरपदाची संधी मिळाली आहे. या आरक्षणाचा कार्यकाळ अजूनही सव्वावर्षाचा आहे. सव्वा वर्षानंतर साधारणपणे कोणते आरक्षण पडणार याची गणिते महापालिकेत मांडली जात आहेत. त्यामध्ये साधारणपणे सर्वसाधारण महिला आरक्षण आणि अनुसूचित जाती महिला आरक्षण पडण्याची शक्यता जास्त आहे. पण सध्याच्या स्थितीत सत्ताधारी मंडळीकडून कोणतेही आरक्षण पडू शकते अशी स्थिती असल्याचे सत्ताधारी मंडळी सांगत आहेत. त्यामुळे मुंबई येथे आरक्षणाच्या सोडतीसाठी सर्व गटाचे इच्छुक उपस्थित राहणार आहेत.

Related posts: