|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा परिषद चौकातील रस्त्यावर डांबरीकरणाला सुरूवात

जिल्हा परिषद चौकातील रस्त्यावर डांबरीकरणाला सुरूवात 

वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी काम युद्धपातळीवर

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील जिल्हा परिषद चौक ते विसावा नाका या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या मार्गाने शहरात येणाऱया वाहनांची संख्या जास्त असल्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे दुसऱया बाजुच्या रस्त्यावर वाहतूकीचा ताण पडून कोंडी होत आहे.

             रस्त्याच्या झालेली चाळण, एक फुटांचे खड्डे वाहनधारकांना तारेवरची कसरत करायला भाग पाडत होते. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाला रस्त्यांच्या डांबरीकरणाचा मुहुर्त मिळत नाही अशी चर्चा सुरू होती. दरम्यान या चर्चेला पुर्णविराम लागला असून शहरातील जिल्हा परिषद ते विसावा नाका या रस्त्यावर मंगळवारी डांबरीकरणाच्या कामाला सूरूवात झाली. हा रस्ता महामार्गाला जोडला जात आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने या मार्गाने येतात. तसेच शासकीय विश्राम गृह, पोवईनाका, गोडोली या मार्गाने येणारी वाहतूकीमुळे हा रस्ता कोंडीत सापडत असतो. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची संख्या जास्त असते. प्रवासादरम्यान अपघात होईल अशी वारंवार परिस्थिती निर्माण झाली होती. डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून एकाच रस्त्याने दुतर्फा वाहतूक होत आहे. यामुळे वाहतूकीवरचा ताण वाढला आहे. सतत होणारी कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस, होमगार्ड तैनात आहेत. 

 

 

Related posts: