|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » निमसोडकरांच्या प्रेमाने इरानी मल्ल भारावले

निमसोडकरांच्या प्रेमाने इरानी मल्ल भारावले 

प्रतिनिधी/ वडूज

निमसोड (ता. खटाव) येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथाच्या वार्षिक यात्रेनिमित्त चालू वर्षी अंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान घेण्यात आले होते. या मैदानासाठी इराण देशातून दोन मल्ल व त्यांचे वस्ताज आले होते. या मैदानात दोन्ही इरानी मल्लांचा पराभव झाला. तरीही निमसोडकर ग्रामस्थांनी त्यांना योग्य मानधन दिले. त्याचबरोबर रात्री रणजितसिंह देशमुख मित्र मंडळाच्या वतीने मल्ल व प्रशिक्षकांना शाही भोजन देण्याबरोबर त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. या अनोख्या स्वागताने इराणी मल्ल चांगलेच भारावून गेले.

         श्री. देशमुख यांच्या आईसाहेब या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास माणचे युवा नेते डॉ. संदिप पोळ, वडूजचे नगरसेवक अभय देशमुख, डॉ. संतोष गोडसे, धनंजय क्षीरसागर, सदाशित्त बागल, दिलीप देशमुख, मोहनराव देशमुख, अभिजीत देशमुख, अशोकराव घाडगे, राजेंद्र माने, संतोष फडतरे, सुरेश फडतरे, ऋषीकेश फडतरे, निलेश घार्गे-देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विरेंद्र देशमुख यांनी पुढच्या वर्षीच्या यात्रेस आवर्जुन येण्यासाठी इरानी मल्लांना निमंत्रण दिले. तर इराणचा पैमान व त्यांच्या प्रशिक्षकांनी निमसोडकरांनी दिलेले प्रेम व आपुलकी कधीही विसरता येणार नाही असे सांगितले. तसेच निमसोडसारख्या गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्यांच्या सहवासामुळे आपणास भारताची संस्कृती समजली. सहकार, उद्योजगतेबरोबर क्रिडा, साहित्य, संस्कृती क्षेत्रामध्ये भरीव काम असणार्या रणजितसिंह देशमुखांच्या नेतृत्वाचा भविष्यकाळ उज्वल असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.

 

Related posts: