|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » भामटय़ांकडून 11 लाखांची फसवणूक

भामटय़ांकडून 11 लाखांची फसवणूक 

 पुणे / प्रतिनिधी :

थायलंड देशाची सहल करून आणण्याच्या बहाण्याने दोघा भामटय़ांनी 40 नागरिकांना 11 लाख 75 हजारांचा गंडा घातला. ही घटना 2018 ते मे 2019 यादरम्यान पुण्यातील येवलेवाडीत घडली आहे.

याप्रकरणी अरविंदकुमार माळी (वय 23, रा. कोंढवा-बुद्रुक, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीत राहणाऱया दोघांनी कोंढवा-बुद्रुक परिसरातील नागरिकांना कमी पैशांत थायलंडची ट्रीप घडवून आणण्याची बतावणी केली होती. त्यानुसार कमी पैशांत थायलंडला जाण्यास मिळणार असल्यामुळे माळी यांच्यासह 40 नागरिकांनी त्या भामटय़ांकडे सहलीसाठी 11 लाख 75 हजार रुपये जमा केले. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही दोघांनी नागरिकांना थायलंड देशाची सहल घडवून आणली नाही. तसेच स्वीकारलेली रक्कमही माघारी दिली नाही. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली.

Related posts: