|Saturday, December 7, 2019
You are here: Home » Top News » बीएडसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया

बीएडसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया 

 बीड / प्रतिनिधी : 

अध्यापक पदवी अभ्यासक्रमातील (बीएड) रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येत आहे. राज्यभरात पाच हजार 683 जागा अद्याप रिक्त असून त्यासाठी विशेष फेरी घेतली जात आहे.

  राज्य सामायिक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षातर्फे बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हुकल्याने यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रक्रिया लांबली. त्यामध्ये सर्वाधिक प्रतीक्षा बीएडला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना करावी लागली. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले. त्यानंतर प्रक्रिया मार्गी लागली. प्रवेशाच्या तीन फेऱयानंतरही राज्यातील मोठय़ा प्रमाणात जागा रिक्त राहिल्या. त्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी आता प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया 11 सप्टेंबरनंतर सुरू झाली, जी ऑक्टोबर अखेर संपली.

   नव्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता 13 नोव्हेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. कागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष प्रवेशासाठी 14 व 15 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली आहे.

 

Related posts: