|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून: संशयित ताब्यात

कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून: संशयित ताब्यात 

कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाडमधील अहिल्यानगर भागालगतच्या झोपडपट्टीलगत एका पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना घडली आहे. श्रेयस सतीश कवठेकर (वय २२,रा.आनंदनगर, सूतगिरणीजवळ, कुपवाड) असे या खून झालेल्याचे नाव आहे. हा  खळबळजनक प्रकार आज, बुधवारी सकाळी उघड़कीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत श्रेयस कवठेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जवळील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत कंपनीच्या गोदामासमोरील एका पडक्या विहीरीत तरुणांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हेल्पलाईन इमरजन्सी रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदरचा मृतदेह हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार कवठेकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला मारहाण करून कमरेला दगड बांधून विहीरीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ओळख पटवून घेण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांना पाचारण केले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. दरम्यान, कवठेकर याचा खून कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.

Related posts: