|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अन्नकोट व दीपोत्सव

जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अन्नकोट व दीपोत्सव 

पुणे / प्रतिनिधी :  

सिंहगड रस्त्यावरील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे अन्नकोट व दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दोन हजार पणत्यांच्या माध्यमातून परिसर उजळून निघाला़ दीपोत्सवासह अन्नकोट देखील संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी स्वस्तिक, ओंकार यासारख्या दिव्यांनी साकारलेल्या शुभचिन्हांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले़.

विद्यार्थ्यांना आपल्या सण आणि उत्सवांची माहिती मिळावी, यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते़ नमकीन पदार्थ, फळे, मिठाई यांसारख्या 56 प्रकारच्या मिष्टांनांचा अन्नकोट मांडण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 


सुरेखा जाधवर म्हणाल्या, अन्नकोट आणि दीपोत्सवाच्या माध्यमातून सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आपल्या संस्कृतीतील शुभ चिन्हे, रंगावलीच्या माध्यमातून हा उत्सव अधिक मंगलमय होतो. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभाग घेतला होता.

Related posts: