|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » भारतात व्होडाफोनचे भविष्य अनिश्चित : निक रीड

भारतात व्होडाफोनचे भविष्य अनिश्चित : निक रीड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 
व्होडाफोन कंपनीचे भारतातील भविष्य अंधारात असून परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्क म्हणून जवळपास 40 हजार कोटी रुपयांचे दायित्व देण्याच्या संदर्भात कंपनीची परिस्थिती गंभीर झाली आहे. असे व्होडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांनी सांगितले आहे. 
सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर ब्रिटिश टेलिकॉम ग्रुप आपली कंपनी विकू शकते असेही रिड यांनी म्हटलेले आहे. त्याच्या या विधानामुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. 
सरकारी नीती, वाढीव कर, सुप्रीम कोर्ट चे निकाल या कारणामुळे टेलिकाॅम कंपन्यावर आर्थिक बोजा वाढला आहे. आसा आरोपही रीड यांनी केला आहे.

Related posts: