|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर 

सांगली : प्रतिनिधी

राज्यात सत्तेची साठमारी सुरू असताना त्याच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवार, (दि15) रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते परतीच्या पावसाने झालेल्या द्राक्ष, डाळींबासह अन्य शेतीच्या नुकसानीची करणार पाहणी आहेत.

याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि आनंदराव पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूरआटपाडी भागातील नुकसानीची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. ज्या दोघांभोवती राज्याचे राजकारण फिरत आहेत ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत तर ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाशिवआघाडी स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

Related posts: