|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » ‘फेसबुक पे’चे सादरीकरण

‘फेसबुक पे’चे सादरीकरण 

व्हॉटसऍप, इंस्ट्राग्राम, मॅसेंजरवरही सुविधा

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

जगभरात प्रसिद्ध असणाऱया सोशल मिडीयातील संवादाचे केंद्र म्हणून फेसबुकला ओळखण्यात येते. परंतु त्याने आपली आणखीन वेगळी ओळख निर्माण केली असून यामध्ये प्रथमच पेमेन्ट्सची सुविधा सुरु केली आहे. यात सहयोगी कंपन्यांमधील फेसबुक, व्हॉटसऍप, मॅसेंजर आणि इंस्ट्राग्राम यांच्यावरही ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने ‘फेसबुक पे’चे सादरीकरण केले आहे.

सध्या अमेरिकेत चालू सप्ताहात फंडरेजिंग, इन-गेम खरेदी, कार्यक्रम तिकीट खरेदी, मॅसेंजरवरही नागरिकांची पेमेन्ट्सचा व्यवहार सुविधा व फेसबुकवर मार्केट प्लेसवर पेजेज आणि व्यापारासंदर्भातील खरेदीची सोय देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. फेसबुक पे ची रचना नियोजनात्मक पद्धतीने केली आहे. या सुविधेचा वापर करताना ग्राहकांना डिजिटल चलन लिब्रा नेटवर्कवर व्यवहार करण्यासाठी कॅलिब्रा वॉलेटपेक्षा वेगळी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 

उपलब्ध सुविधा

फेसबुक ऍप किंवा वेबसाईटवर सेटींगचा पर्याय निवडून ‘फेसबुक पे’ला  पेमेन्ट्स सुविधेला जोडावे त्यानंतर पेमेन्ट्स सुविधा वापरावी. यासोबतच व्हॉटसऍप आणि इंस्ट्राग्राम फेसबुक पे सुविधा संबंधीत ऍपवरही उपलब्ध होऊ शकणार असल्याचे स्पष्टीकरण केले आहे.

Related posts: