|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » ‘एमजी’ मोटर्स 5 हजार कोटीची गुंतवणूक करणार

‘एमजी’ मोटर्स 5 हजार कोटीची गुंतवणूक करणार 

बॅटरी निर्मितीचे केंद्र उभारणार : आगामी काळात कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे ध्येय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एमजी मोटर्स येत्या तीन ते चार वर्षात भारतात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. यानंतर कंपनी अफोर्डेबल इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेणार असून त्यासोबत इलेक्ट्रिक बॅटरी निर्मितीचा प्रकल्प देशात उभारण्याच्या तयारीत कंपनी असल्याचे यावेळी म्हटले आहे. यासर्व कामासाठी कंपनी तब्बल 5 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे.

कारचे विशेष मॉडेल

आगामी काळात एमी मोटर्स भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरण्यात येणाऱया बॅटरीचे उत्पादनाचा प्रकल्प उभारणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक कारचे उत्पादन वाढविण्यास मोठी मदत होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये पहिली इलेक्ट्रिक कार एमजी झेड एस ईव्ही सादर करण्यात येणार असून यांची किंमत  25 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.

तर याची मुंबई, बेंगळूर, अहमदाबाद आणि हैदराबाद या ठिकाणी विक्री करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एसयूव्हीमध्ये 44.5 केडब्लूएच क्षमतेची बॅटरी देण्यात येणार असून एका चार्जवर तब्बल 325 कि.मी. कार धावणार असल्याची माहिती एमजीने दिली आहे. 

लवकरच उत्पादन

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत मोठी झेप कंपनी घेणार असून त्यासाठी लवकच देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे केंद्र उभारणार असून त्यासाठी 100 युनिट्स प्रति महिन्याला कारचे उत्पादनाचे ध्येय निश्चित करणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी दिले आहे.

 

Related posts: