|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » ‘भीम यूपीआय’चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

‘भीम यूपीआय’चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 

सिंगापूर प्रदर्शनात सादरीकरण : एनपीसीआय-नेट्स एकत्रित

वृत्तसंस्था/ सिंगापूर

पेमेन्ट सुविधाची सोय देणाऱया देशातील ‘भीम यूपीआय’चे प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूर येथे प्रदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये क्युआरवर आधारीत पेमेन्ट व्यवस्थेचे बुधवारी सिंगापुरात पायलट पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण ‘सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हल’ 2019 मध्ये एका मर्चंट टर्मिनलच्या देवाण घेवाणीच्याप्रसंगी भीमचे प्रदर्शन करण्यात आले.

या योजनेसाठी नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि सिंगापूर नेटवर्क फॉर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर (नेट्स) यांच्याकडून संयुक्तपणे ही योजना विकसित करण्यात आली आहे.

प्रथमच प्रत्यक्ष व्यवहार

ही पहिलीच वेळ आहे, की देशाच्या बाहेर प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर भीम ऍपचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यातूनच प्रथम प्रात्यक्षिक व्यवहार करण्यात आले असल्याचे सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त जावेद अशरय यांनी सांगितले.

 रूपे कार्डचा स्थानिक वापर

2020च्या फेब्रुवारीपर्यंत सर्व रूपे कार्डचा वापरात आणणार असून तंत्रज्ञान क्षेत्रात वापर वाढविण्यास सिंगापूरमध्ये प्रयत्न होणार आहेत.

Related posts: