|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » solapur » श्री पांडुरंग, नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे वेळापुरात स्वागत

श्री पांडुरंग, नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे वेळापुरात स्वागत 

प्रतिनिधी / वेळापूर

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदीकडे निघालेल्या श्री पांडुरंग पादुका व संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे वेळापुरात मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. हे सोहळे सायंकाळी खुडूस मुक्कामी विसावले.

श्री पांडुरंग पादुका श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळे पहाटे २ वाजता भंडीशेगाव येथून वेळापूरकडे मार्गस्थ झाले. पिराची कुरोली, टप्पा मार्गे दसूर पाटी येथे त्यांनी माळशिरस तालुक्यात प्रवेश केला. धनंजय सावंत यांनी सोहळ्याचे स्वागत केले. तोंडले बोंडले येथे सकाळची न्याहरी करुन दुपारचा नैवेद्य, आरती व विश्रांतीसाठी श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा वेळापूर येथील श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टच्या भक्तनिवासात तर संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा खंडोबा मंदिरात पोहोचला. ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख , सदगुरु साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाळासाहेब कर्णवर यांच्या हस्ते करण्यात आले .

श्री पांडुरंग पादुकांची पूजा ट्रस्टचे सदस्य पांडुरंगराव माने देशमुख, रत्नप्रभा माने देशमुख, विजय माने, वैशाली माने यांच्या हस्ते करण्यात आली. पुजेचे पौरोहित्य कुलदीप कुलकर्णी व सतीश कंदारकर यांनी केले. यावेळी ह भ प विठ्ठल महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, एकनाथ महाराज वासकर, गोपाळ देशमुख, वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष  सूर्यकांत भिसे, सचिव संजय उरणे, सदस्य अजीत साठे, अनिल माने, सतीश नवले, महाविर मुंगुसकर यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते . वेळापूर शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत व वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. दुपारी हा सोहळा खुडूस मुक्कामासाठी मार्गस्थ झाला .

Related posts: