|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » आयआरसीटीसी’च्या समभागांची किंमत तीन पटीने वाढली

आयआरसीटीसी’च्या समभागांची किंमत तीन पटीने वाढली 

गुंतवणूकदारांची चांदी : तिकीट विक्रीत वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई 

शेअर बाजारातील इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन कंपनीच्या (आयआरसीटीसी) समभागांमध्ये मोठा उत्साह राहिल्याचे पहावयास मिळत आहे. 320 रुपयावर सादर झालेल्या समभागांमध्ये तब्बल तीन पट वाढ नोंदवत 969 रुपयावर हे मूल्य पोहोचलो आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात मोठी वाढ झाली आहे. दुसऱया तिमाही अहवालानंतर आयआरसीटीसीच्या समभागांनी बुधवारी उच्चांकी कामगिरीची नोंद केली आहे.

आयआरसीटीसीच्या समभागांनी 981.35 रुपयाची मोठी झेप घेतली त्यानंतर मात्र मुंबई शेअर बाजारात समभाग 969.05 वर कार्यरत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. कंपनीने 14 ऑक्टोबरसाठी किरकोळ समभागाचे मूल्य 320 रुपये निश्चित केले होते.

कंपनीच्या समभागांनी बुधवारी मात्र तीन पट अधिकची वाढ नोंदवली आहे. मिडकॅपची भरारी

आयआरसीटीसीचा भांडवली बाजारातील मिडकॅप 15,000 कोटी रुपयावर पोहोचला आहे. ही माहिती पीटीआयच्या एका अहवालात देण्यात आली आहे. आयआरसीटीसीची रेल्वे तेजस एक्स्प्रेसने चालू वर्षातील ऑक्टोबरपर्यंत 70 लाख रुपयाचा नफा कमवला आहे.  यातील तिकीट विक्री 3.70 कोटी रुपयाची झाली आहे.

Related posts: