|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » किरकोळ महागाईत वाढ

किरकोळ महागाईत वाढ 

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

नवी दिल्ली

 ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) म्हणजेच किरकोळ महागाई दराप्रकरणी सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. भाज्यांच्या किमतीतील वृद्धीमुळे किरकोळ महागाई दर ऑक्टोबर महिन्यात वाढून 4.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात हा आकडा 3.99 टक्के इतका होता.

मासिक आधारावर ऑक्टोबरमध्ये भाज्यांचा महागाई दर 15.4 टक्क्यांवरून वाढत 26 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर डाळींचा महागाई दर वाढून 11.72 टक्के झाला आहे. सप्टेंबर मध्ये हा आकडा 8.34 टक्के इतका होता.

वीज आणि इंधनाचा महागाई दर सप्टेंबरच्या उणे 2.18 टक्क्यांच्या तुलनेत उणे 2.02 टक्के राहिला आहे. गृहबांधणी क्षेत्राप्रकरणी किरकोळ महागाई दर सप्टेंबरमधील 7.75 टक्क्यांवरून कमी होत 4.58 टक्क्यांवर आला आहे. वस्त्र आणि पादत्राणांचा किरकोळ महागाई दर 1.65 टक्के झाला आहे.

लक्ष्यापेक्षाही अधिक

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई 4 टक्क्यांनजीक राखण्याचे लक्ष्य बाळगले आहे. पण खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई दर या लक्ष्यापेक्षाही अधिक आकडय़ावर पोहोचला आहे.

Related posts: