|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » निमंत्रीत जिल्हा खो खो स्पर्धेत अभयसिंहराजे भोसले विदयालयाने पटकावले विजेतेपद

निमंत्रीत जिल्हा खो खो स्पर्धेत अभयसिंहराजे भोसले विदयालयाने पटकावले विजेतेपद 

वार्ताहर/ परळी

संघर्ष कीडा मंडळ कवठे यांच्या मार्फत आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रीत जिल्हा खो खो स्पर्धेत अभयसिंहराजे भोसले विदयालय सोनवडी गजवडी व स्वराज्य कीडा मंडळ सोनवडी गजवडी च्या संघाने विजेतेपद पटकावले. संघर्ष कीडा मंडळ कवठे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी सोनवडी गजवडी,मसुर अ,खराडे, मायणी, नवरस्ता, ओगलेवाडी, कवठे अ, शिवनगर बडोली, खंडाळा मसुर ब, रहिमतपुर कवठे ब या संघांनी भाग घेतला होता.

सोनवडी गजवडीच्या संघाने प्रथम खराडे संघाला 1 डाव 13 गुणांनी पराभव करून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला . सेमी फायनल मध्ये मायणी संघाचा 1 डाव 2 गुणांनी पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये शिवनगर संघाबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये शिवनगर संघावर मात करीत विजेतेपद पटकावले.प्रथम कमांकास चषक व रोख 7111 रूपयांचे बक्षीसही पटकावले. यशस्वी विदयार्थाना संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद जाधव,सचिव श्री. लक्ष्मण झणझणेसर,खजिनदार श्री. माधवराव कदम, संचालक धनाजी कदम, युसुफ पटेल,राजेंद्र कारंडे, महादेव खामकर, शिवाजी कदम,धोंडीराम कदम तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव,पर्यवेक्षक दिलीप खामकर, कीडा शिक्षक ज्ञानेश्वर जांभळे, निलकंठ तोडकरी, पांडुरंग सुतार,शशिकांत गाढवे, दयानंद पवार,सुनिल शिंदे, चंद्रकांत धर्माधिकारी,अशोक कदम तसेच सोनवडी गजवडी गावचे सरपंच,पोलीस पाटील तसेच भोंदवडे,मानेवाडी,कारी,कुस,

बनघर,परळी गावातील गामस्थांनी अभिनंदन केले. 

यशस्वी विदयार्थाना महेंद्र गाढवेसर,माजी खेळाडू प्रणित कदम,ओंकार कदम, चेतन कदम,अक्षय लोकरे,अमित कदम ,विपुल पानसरे यांचे मार्गदर्शन लाभले .

Related posts: