|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे करा

शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे करा 

प्रतिनिधी/ मेढा

जावली तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाचे शेती नुकसानीचे पंचनामे तयार करा अन्यथा शिवसेना याबाबत आंदोलन करेल असा इशारा लालबाग परळचे माजी आमदार , शिवसेना जिल्हा समन्वयक मा. श्री. दगडू ( दादा ) संकपाळ यांनी दिला आहे.

मेढा येथे आयोजीत पत्रकार सभेत ते बोलत होते यावेळी शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक एस.एस. पार्टे गुरुजी, एकनाथ ओंबळे , विश्वनाथ धनावडे, सचिन जवळ, सचिन करंजेकर ,नामदेव चिकणे ,आणि शिवसैनिक उपस्थित होते.

जावली तालुक्यातील शेतकरी वर्ग प्रामुख्याने आपली उपजिविका साधन म्हणून शेती करतात. जावलीत या वेळी पावसाने चांगलेच थैमान घातले असून पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे उपासमारी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे.तालुक्यातील शेतकयांची भयावह अवस्था असून या विभागातील पिकांचे  पंचनामे नक्की कशा प्रकारे झाले आहेत या बाबतची माहिती तहसिलदार यांना विचारली असता माहिती घेवून सांगण्यात येईल असे सांगून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने अधिकारी वर्ग कशा प्रकारे माहिती गोळा करतात हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही ठिकाणी पंचनामे झाले परंतु काही ठिकाणी नाही अशी माहिती मिळत असून अधिकारी वर्ग शेतकयांच्या बांधावर तरी जात आहे का की   दुरूनच डोंगर साजरे अशी अवस्था निर्माण झाली आहे

तरी याबाबत जिल्हाधिकारीसो यांनी लक्ष घालून शेतकयांना न्याय मिळवून द्यावा, अधिकारी वर्गाने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी असेही सुचित करण्यात आले  असून फक्त भातपिकाचे पंचनामे न करता इतरही धान्यांचा योग्य पंचनामा करावा अश्या भावना  काही शेतकरी बांधवांनी व्यक्त केल्या.

  

Related posts: